“Aaple Sarkar” हा महाराष्ट्र, सरकारचा एक उपक्रम आहे, ज्याचा उद्देश नागरिकांना अधिक कार्यक्षमतेने आणि पारदर्शकपणे विविध सरकारी सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देणे आहे. आपले सरकार पोर्टलद्वारे, नागरिक प्रमाणपत्रे, परवाने, आणि इतर विविध प्रकारच्या सेवांसाठी अर्ज करू शकता. यात तक्रार निवारण यंत्रणा देखील समाविष्ट आहे जिथे लोक तक्रारी किंवा त्यांना सरकारी सेवांबाबत भेडसावणाऱ्या समस्या नोंदवू शकतात.
प्रशासनाला नागरिकांच्या जवळ आणण्यासाठी आणि सरकारी कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी देण्याची गरज कमी करण्यासाठी या पोर्टल ला बनवण्यात आले आहे.
Services Available on Aaple Sarkar Portal
- Online Certificates >>
- Age Nationality Certificate
- Income Certificate
- Non Creamy Layer
- Caste Certificate
- Birth Certificate
- Death Certificate
- Certificate of Registration of Marriage
- Other Certificates
- Licenses Apply/Renewal
- Permits
- Track Your Application
- Verify Your Authenticated Certificate
- Other Services
Registration on Aaple Sarkar
जर तुम्ही आपले सरकार पोर्टलवर नवीन वापरकर्ता असाल तर तुम्हाला मूलभूत तपशील देऊन आणि Username आणि Password तयार करून स्वतःची नोंदणी करावी लागेल.
- नोंदणी करण्यासाठी अधिकृत aaplesarkar.mahaonline.gov.in पोर्टलला भेट द्या त्यानंतर New User ? Register Here.. या बटनावर क्लिक करा.
- रेजिस्ट्रेशन साठी तुम्हाला Option 1 आणि Option 2 असे दोन पर्याय येतील यात तुम्हाला जो सोयीस्कर वाटेल त्यावर क्लिक करा आम्ही इथे Option 1 पर्याय निवडत आहोत.
- आता रेजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचे District निवडा नंतर Mobile Number टाकून OTP भरा. त्यानंतर User Name आणि Password बनवा. शेवटी तुमचे Full Name, Date of Birth, आणि Age टाकून Declaration वर टिक मार्क करून Register बटनावर क्लिक करा.
Login on Aaple Sarkar
जर तुम्ही आपले सरकार पोर्टलवर जुने वापरकर्ता असाल किंवा तुम्ही आत्ताच रेजिस्ट्रेशन केले असेल तर तुम्हाला सर्विसेस वापरण्यासाठी या पोर्टल Login करावे लागेल.
- लॉगिन करण्यासाठी अधिकृत aaplesarkar.mahaonline.gov.in पोर्टलला भेट द्या त्यानंतर Username आणि Password टाकून Captcha भरून तुमचे District निवडा शेवटी Login बटनावर क्लिक करा.
Apply for a Service
- विभाग निवडा: डॅशबोर्डवर, तुम्हाला आवश्यक असलेली सेवा ज्या विभागांतर्गत येते तो विभाग निवडा (उदा. महसूल विभाग, नागरी विकास इ.).
- सेवा निवडा: तुम्ही ज्या विशिष्ट सेवेसाठी अर्ज करू इच्छिता त्यावर क्लिक करा.
- अर्ज भरा: अर्जामध्ये विनंती केल्यानुसार आवश्यक तपशील द्या. सर्व अनिवार्य फील्ड भरण्याची खात्री करा.
- दस्तावेज अपलोड करा: आवश्यक दस्तावेज निर्दिष्ट स्वरूपात अपलोड करा (सामान्यतः PDF किंवा JPEG).
- अर्ज फी भरा: सेवेशी संबंधित फी असल्यास, तुम्ही नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा UPI सारखे विविध पेमेंट पर्याय वापरून ऑनलाइन पैसे देऊ शकता.
- अर्ज सबमिट करा: फॉर्म भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन करा आणि नंतर “सबमिट करा” वर क्लिक करा.
Track Your Application
- जर तुम्ही कुठल्या सेवे साठी आपले सरकार पोर्टलवर अर्क केला असेल तर त्याची स्थिती तपासण्यासाठी होमेपज वर असलेल्या Track Your Application या लिंक वर क्लिक करा त्यानंतर विभाग आणि सेवा निवडून Application ID भरून Go बटनावर क्लिक करा.
- जर तुमचा अर्ज स्वीकृत झाला असेल तर तुम्ही Login करून तुमचे Certificate Download करू शकता.
Verify Certificate
- आपले सरकार वर सर्टिफिकेट व्हेरिफाय करण्याची सुविधा आहे त्यासाठी पोर्टल वर दिलेल्या Verify Your Authinticated Certificate या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर विभाग आणि सेवा निवडून Application ID भरून Go बटनावर क्लिक करा.
Aaple Sarkar Contact Details
अधिक माहिती अथवा विचारणेसाठी संपर्क क्र. नागरिक संपर्क केंद्र – उपलब्ध 24×7 1800 120 8040 (टोल फ्री) |