Ladki Bahin Yojana माझी लाडकी बहिन योजना – अर्ज करा, पात्रता, कागदपत्रे

माझी लाडकी बहिन योजना, ज्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना म्हणूनही ओळखले जाते, ही महाराष्ट्र सरकारची नवीनच योजना आहे. ज्यात राज्यातील गरीब व गरजू महिलांना आर्थिक पाठींबा देण्याचे उद्दिष्ट आहे.

योजनेचा लाभ
“योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना दरमहा ₹१,५०० म्हणजेच वर्षाला ₹१८,००० मिळतील. या पैशातून दैनंदिन खर्च आणि घरगुती गरजांसाठी त्यांना मदत होऊल.

Important Dates

अर्ज भरण्यास सुरूवात >>१ जुलै २०२४
अंतिम तारीख >>३१ ऑगस्ट २०२४
 • ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना १ जुलै २०२४ पासुन दार माह Rs १५०० लाभ देण्यात येईल.

माझी लाडकी बहिन योजनेसाठी पात्रता

 • महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • नुकतीच वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे. तुमचे वय १८ ते ६५ दरम्यान असणे आवश्यक आहे.
 • तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
 • तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता नसावा.
 • ट्रॅक्टर सोडून घरात इतर कोणतेही चारचाकी वाहन नसावे.
 • एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांना माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेता येईल.

आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • अधिवास प्रमाणपत्र /जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला *
  • अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर 15 वर्षापूर्वीचे (१) राशनकार्ड (२) मतदार ओळखपत्र (३) जन्म प्रमाणपत्र (४) शाळा सोडल्याचा दाखला
 • उत्पन्न प्रमाणपत्र / पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड *
 • अर्जदाराचे हमीपत्र *
 • बँक पासबुक *
 • अर्जदाराचा फोटो *
 • महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र / 15 वर्षापूर्वीचे (१) राशनकार्ड (२) मतदार ओळखपत्र (३) जन्म प्रमाणपत्र (४) शाळा सोडल्याचा दाखला

अर्ज कुठे करावा

Online (ऑनलाइन)

 • ऑनलाइन अर्ज Narishakti Doot या ऍप वर करता येईल.

Offline (ऑफलाईन)

 • ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे अर्ज करावा.
 • शहरी भागातील महिलांनी त्यांच्या वॉर्ड अधिकाऱ्याकडे अर्ज करावा.

Leave a Comment

error: