महाराष्ट्र राज्यातील ६5 वर्षे वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दररोज च्या जीवनात सामान्य स्थितीत
जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी
आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणे करीत तसेच त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी एकवेळ एकरकमी रु. ३०००/- पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात DBT द्वारे देण्यात येईल.
योजनेचे स्वरूप
मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार खालील प्रकारची साधने/उपकरणे खरेदी करता येईल.
- चष्मा
- श्रवणयंत्र
- ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर
- फोल्डिंग वॉकर
- कमोड खुची
- नि-ब्रेस
- लंबर बेल्ट
- सर्वाइकल कॉलर इ.
तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत आणि राज्य शासनाद्वारे नोंदणीकृत योगोपचार केंद्र, मन:स्वास्थ केंद्र / प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड/मतदान कार्ड
- राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचे २ फोटो
- स्वयं घोषणापत्र
- शासनाने ओळखपत्र पटवण्याकरिता विहित केलेली अन्य कागदपत्रे
योजनेसाठी पात्रता
- ज्या नागरिकांनी दि. ३१/१२/२०२३ पर्यंत वयाची ६५ वर्ष पूर्ण केली असेतील, असे नागरिक पात्र समजण्यात येईल.
- लाभार्थी पात्रतेसाठी प्रमाणपत्र किंवा BPL राशन कार्ड किंवा वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो.
- लाभार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न २ लाख रुपयांच्या आत असावे याबाबतचे स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील.
- सादर व्यक्तीने महिला ३ वर्षात स्थानीय स्वराज्य संस्था आणि सरकार कडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे.
- पात्र लाभार्थ्यांच्या बँकेत ३००० रुपये लाभ प्राप्त झाल्यावर उपकरणे खरेदी केल्याचे देयक (Invoice) ३० दिवसाच्या आत संबंधित पोर्टल वर अपलोड करणे बंधन कारक राहील. अन्यथा लाभार्थ्यांकडून सादर रक्कम वसूल करण्यात येईल.
वयोश्री योजनेसाठी अर्ज कसा करावा
वरील अर्ज डाउनलोड करून संपूर्ण माहिती भरा आणि तुमच्या नजीकच्या समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन हा अर्ज कागदपत्रांसोबत Submit करा.