देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा तसेच त्यांना स्वयपांकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्वला योजना २०१६ मध्ये सुरु करण्यात आली. या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरु आहे .
महाराष्ट्रात सध्यस्थितीत प्रधान मंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत गॅस जोडणी घेतलेल्या लाभार्थ्यांना बाजार भावाने गॅस सिलेंडर Refill करणे शक्य होत नाही. या व्यतिरिक्त १ सिलेंडर संपल्यानंतर २ रे उपलब्ध होईपर्यंत स्वयपांकाकरीता साधन उपलब्ध नसल्यामुळे, ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहचवत आहे.
सादर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र सरकाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा २०२४-२५ मध्ये केली या योजने अंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ही वार्षिक ३ गॅस सिलेंडर मोफत Refill करून देण्यात येईल.
योजनेचा लाभ |
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत Refill करून मिळेल |
लाभार्थ्यांची पात्रता
- सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅसजोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक.
- सध्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजने साठी पात्र असलेले लाभार्थी हि या योजनेस पात्र असतील.
- सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने साठी पात्र असलेले लाभार्थी हि या योजनेस पात्र असतील.
- एका कुटुंबात (राशन कार्ड नुसार) केवळ एक लाभार्थी सादर योजनेस पात्र असेल.
- सादर लाभ केवळ १४.२ कि.ग्रॅ. वजनाच्या गॅस सिलेंडर जोडणी असलेल्या गॅस धारकांना लागू असेल.
योजनेची कार्यपद्धती
1) प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्त्यांसाठी
- प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्त्यांना गॅस सिलेंडर चे वितरण तेल कंपन्यांच्या मार्फत करण्यात येते. तर अन्नपूर्णा योजनेचे ३ मोफत गॅस सिलेंडर चे वितरण हि तेल कंपन्यांच्या मार्फत करण्यात येईल.
- सध्या प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत वितरीत होणाऱ्या गॅस सिलेंडरचे बाजार भाव (सरासरी ८३० रुपये) आहे केंद्र शासन (३०० रुपये) सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करते.
- तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून घ्यावयायची अंदाजे ५३० रुपये प्रति सिलेंडर, इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करावी तसेच लाभार्थ्यांची यादी कंपनीच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करा आणि शासनास उपलब्ध करावी.
- लाभार्थ्यास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर साठी सबसिडी देण्यात येणार नाही.
- जिल्हानिहाय सिलेंडर च्या किंमतींत फरक असल्यामुळे वितरित केलेल्या सिलेंडर च्या किंमतीच्या आधारावर आणि जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल.
- Read More
2) लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत ३ मोफत सिलेंडर चे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल.
- लाभार्थ्यास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर साठी सबसिडी देण्यात येणार नाही.
- समितीने निश्चित केलेल्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीर्ण योजनेच्या लाभार्थ्यांची कुटुंबनिहाय माहिती नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई /जिल्हा पुरवठा अधिकारी /अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील तेल कंपन्यांना द्यावी.
- मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे (राशन कार्डनुसार) कुटुंब सुनिश्चित करणे.
- या शासन निर्णयाप्रमाणे दि. 01 जुलै, 2024 रोजी पात्र होर्णाऱ्या लाभार्थ्यांनाच सदर योजनेचा लाभ देण्यात येईल.
- दि. 01 जुलै, 2024 रोजीनंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका सदर योजनेस पात्र ठरर्णार नाहीत.
- Read More
अन्नपूर्णा योजनेचा लाभ कसा घ्यावा
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या संबंधित गॅस Agency मध्ये जाऊन e-KYC करावी तसेच लाभार्थ्यांचे बँक खाते आधार शी संलग्न करून घ्यावे.