WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Ladka Bhau Yojana माझा लाडका भाऊ योजना – अर्ज करा, पात्रता, कागदपत्रे

आता लाडकी बहीण पाठोपाठ सरकार ने लाडक्या भावासाठी सुद्धा लाडका भाऊ योजना आणली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने राज्यातील बेरोजगार तरुणांना आधार देण्यासाठी सुरू केलेला एक उपक्रम आहे.

या योजनेचा उद्देश तरुण व्यक्तींना सक्षम करण्यासाठी आर्थिक सहाय्य आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना रोजगार सुरक्षित करण्यात मदत करणे हा आहे.

शैक्षणिक अर्हतेनुसार विद्यावेतनाचे विवरण खालील प्रमाणे नुसार असेल.

शैक्षणिक अर्हताप्रतिमाह विद्यावेतन
१२ वी पास6,000
डिप्लोमा8,000
पदवीधर10,000

उमेदवारांची पात्रता

  • उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल 35 वर्य असावे.
  • उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२वी पास/आयटीआय/पदविका/पदवीधर/पदव्युत्तर असावी.
  • उमेदवार हा महाराष्ट्राचा निवासी असावा.
  • उमेदवाराचे आधार नोंदणी असावी.
  • उमेदवाराचे बँक खाते आधार कार्ड शी संलग्न असावे.
  • उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर नोंदणी केलेली असावी.

Note तुम्ही आपले सरकार पोर्टलवर उत्पन्न, अधिवास, जात आणि इतर प्रमाणपत्रांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

योजनेची वैशिष्टे

  • पात्र आणि रोजगार इच्छुक असणारे उमदेवार rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी करू शकतील.
  • या कार्यक्रमाद्वारे दरवर्षी सुमारे १० लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील.
  • नोकरीचे प्रशिक्षण 6 महिने चालेल, आणि उमेदवारांना सरकार द्वारे विद्यावेतन मिळेल.
  • विद्यावेतन थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.

Important Links

लाडकी बहीण योजना – Apply Online (Nari Shakti Doot)माझी लाडकी बहीण योजना पात्रता (नियम व अटी), कागदपत्रे
लाडकी बहीण योजना Form Edit (चूक दुरुस्ती)मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना – CMYKPY
Spread the love

6 thoughts on “Ladka Bhau Yojana माझा लाडका भाऊ योजना – अर्ज करा, पात्रता, कागदपत्रे”

Leave a Comment

error: