बांधकाम कामगार योजने अंतर्गत ३२ प्रकारच्या योजनेचा लाभ या बांधकाम कामगारांना दिला जातो. या योजनेत भांड्यांचा सेट, पेटी, कामगारांच्या मुलांच्या लग्नासाठी खर्च तसेच इतर भरपूर योजना या बांधकाम कामगारांना मिळतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना नोंदणी करणे गरजेचे आहे.
नोंदणी पात्रता निकष
- १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार
- मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार
आवश्यक कागदपत्रे
- वयाबाबतचा पुरावा (आधारकार्ड / पॅनकार्ड / ड्रायविंग लायसन्स / जन्म दाखला / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र) कोणतेही एक
- मागील वर्षात ९० किंवा किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र (मालक, ग्रामसेवक, म.न.पा, न.पा. ने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र) यापैकी एक
- रहिवासी पुरावा (आधारकार्ड / राशन कार्ड / ड्रायविंग लायसन्स / मागील महिन्याचे वीजबिल / ग्रामपंचायत दाखला) कोणतेही एक
- फोटो आयडी पुरावा (आधारकार्ड / पॅनकार्ड / ड्रायविंग लायसन्स / मतदान कार्ड)
- बँक पासबुक ची झेरॉक्स
- पासपोर्ट आकारातील ३ रंगीत फोटो
नोंदणी करीता फी
नोंदणी फी २५/- रुपये (एकदाच) व मासिक वर्गणी १/- रुपये प्रमाणे ५ वर्षाकरिता ६०/- रुपये जमा करणे आवश्यक आहे. |
कल्याणकारी योजना List
- सामाजिक सुरक्षा >
- पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्ती साठी ३०,०००/- रुपये
- मध्यान्ह भोजन योजना
- प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
- प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना
- प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना
- पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना
- शैक्षणिक >
- १ली ते ७वी च्या विध्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष २,५०० रुपये/- आणि ८वी ते १०वी च्या विध्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष ५,००० रुपये/-
- १०वी आणि १२वी मध्ये ५० आणि त्याहून अधिक गुण प्राप्त झाल्यास १०,००० रुपये
- ११वी ते १२वी च्या शिक्षणासाठी प्रतिवर्ष १०,००० रुपये/-
- पदवीच्या शिक्षणासाठी प्रतिवर्ष २०,००० रुपये/-
- वैदकीय पदवीकरीत प्रतिवर्ष १००,००० रुपये /- आणि अभियांत्रिकी पदवीकरिता ६०,००० रुपये /-
- शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी २०,००० रुपये आणि शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी २५,००० रुपये
- दोन पाल्यांना MS-CIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती
- आरोग्यविषयक >
- नैसर्गिक प्रसूतीसाठी १५,००० रुपये आणि शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी २०,००० रुपये
- गंभीर आजाराच्या उपचारार्थ १००,००० रुपये
- एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नवे १८ वर्षापर्यंत १००,००० रुपये मुदत देव
- ७५% किंवा कायमचे अपंगत्व आल्यास २००,००० रुपये
- महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना
- आरोग्य तपासणी करणे
- आर्थिक >
- कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास ५००,००० रुपये
- कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास २००,००० रुपये
- अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) २००,००० रुपये
- अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) २००,००० रुपये
- कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरिता १०,००० रुपये (वय ५० ते ६०)
- कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस २४,००० रुपये (५ वर्षाकरिता)
Note – नियम व अटी लागू*
बांधकाम कामगार योजना ऑनलाइन अर्ज करा
- बांधकाम कामगार योजनेची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी अधिकृत पोर्टल mahabocw.in वर जा त्यानंतर बांधकाम कामगार: नोंदणी या लिंक वर क्लिक करा.
- आता ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी करायची आहे त्यांचा आधार नंबर आणि चालू मोबाइल नंबर भरून Proceed to Form या बटनावर क्लिक करा.
- अर्ज मध्ये तुम्हाला वैयक्तिक माहिती, आधार कार्ड नुसार पत्ता, कौटुंबिक माहिती, कामकाजाची माहिती भरून आणि आवश्यक दस्तावेज अपलोड करून फॉर्म Submit करायचा आहे.
Important Links
>> बांधकाम कामगार योजना ऑनलाइन नोंदणी फॉर्म PDF – Download | >> बांधकाम कामगार योजना लाभार्थी List, Status |
Form chukicha bharllyavar durust kasa karayecha yachyavar kahi upay sanga